राष्ट्रवादीच्या नगरसेवकावर जीवघेणा हल्ला, attack on sanjay patil

राष्ट्रवादीच्या नगरसेवकावर जीवघेणा हल्ला

राष्ट्रवादीच्या नगरसेवकावर जीवघेणा हल्ला
www.24taas.com, नवी मुंबई

नवी मुंबई महानगरपालिकेचे प्रभाग क्रमांक २५ चे नगरसेवक संजय पाटील यांच्यावर घणसोलीमध्ये रात्री तीन अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला.

राष्ट्रवादीचे नगरसेवक संजय पाटील हे गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास आपले काका सुधीर पाटील यांच्याबरोबर मोटारसायकलवरून घरी परतत असताना ही घटना घडली. निर्जन रस्त्यावर काही अज्ञात व्यक्तींनी त्यांची मोटारसायकल अडवून त्यांच्यावर पिस्तूल रोखलं. यावेळी संजय पाटील यांनी प्रतिकार केला असता. यामुळे चिडलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर चॉपरनं हल्ला केला.

या जीवघेण्या हल्ल्यातून संजय पाटील बचावले असले तरी त्यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झालीय. त्यांच्या उजव्या हाताची करंगळी कापली गेली.

हल्लेखोर स्कार्पिओ आणि स्विफ्ट डिझायर गाडीतून आले होते. संजय पाटील आणि सुधीर पाटील या दोघांवर कोपरखैरणेमधील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

First Published: Friday, April 12, 2013, 09:27


comments powered by Disqus