सुरेश बिजलानीवर दिवसाढवळ्या जीवघेणा हल्ला, attack on suresh bijlani

सुरेश बिजलानीवर दिवसाढवळ्या जीवघेणा हल्ला

सुरेश बिजलानीवर दिवसाढवळ्या जीवघेणा हल्ला
www.24taas.com, झी मीडिया, नवी मुंबई

नवी मुंबईतल्या एस. के. बिल्डर हत्या प्रकरणातला आरोपी सुरेश बिजलनीवर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. दोन हल्लेखोरांनी त्याच्या कारवर गोळीबार केला.

सुरेश बिजलानी यांच्यावर हल्ला करणारे दोन्ही हल्लेखोर बाईकवरुन आले होते, त्यांनी बिजलानी याच्या कारच्या काचा फोडल्या. मात्र या हल्ल्यात बिजलानी याला इजा झालेली नाही. बिजलानी हा सुनील कुमार बिल्डर हत्या प्रकरणातला आरोपी असून त्याला सध्या अटकपूर्व जामीन मिळाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी बिजलानी बरोबर एका एन्काऊंटर स्पेशालिस्टलाही अटक केली होती.

बिल्डर सुनील कुमार यांनी माहितीच्या अधिकाराखाली नवी मुंबई एफएसआय घोटाळ्याचा पर्दाफाश केला होता. यामुळे बिजलानी आणि अनुराग गर्ग हा आर्किटेक्ट यांना चांगलाच फटका बसला होता. त्यानंतर सुनील कुमार यांची दिवसा ढवळ्या हत्या झाली होती. हे प्रकरण अजूनही न्यायप्रविष्ठ असतानाच सुनील कुमार हत्या प्रकरणातला आरोपी बिजलानीवर झालेला जीवघेणा हल्ला चर्चेचा विषय ठरलाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, May 24, 2013, 16:18


comments powered by Disqus