Last Updated: Thursday, December 26, 2013, 20:54
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई गुरुवारी, राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एक मोठा धक्का बसलाय. मनसे सरचिटणीस अतुल सरपोतदार यांचं सायंकाळी ७.०० वाजल्याच्या सुमारास निधन झालंय.
शिवसेना नेते मधुकर सरपोतदार यांचे यांचे अतुल सरपोतदार हे पुत्र... हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं अतुल सरपोतदार यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
सरपोतदार हे मनसेच्या महत्वाच्या शिलादारापैकी एक होते. त्यांच्या अचानक जाण्यानं मनसे हादरलीय. `मनसेचा एक मावळा हरपल्या`ची खंत पक्षात व्यक्त होतेय.
राज ठाकरे यांचे अत्यंत निकटचे आणि निष्ठावंत सहकारी अशी अतुल सरपोतदार यांची ओळख आहे. भारतीय विद्यार्थी सेनेपासून ते राज ठाकरे यांच्यासोबत काम करत होते. राज ठाकरे यांनी जेव्हा स्वतःचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष काढला त्यावेळी त्यांच्या सोबत शिवसेनेला जय महाराष्ट्र करत अतुल सरपोतदार यांनी राज ठाकरे यांची साथ दिली.
अतुल सरपोतदार यांच्याकडे मनसेतील सर्वात मोठी म्हणजे सरचिटणीस ही जबाबदारी देण्यात आली होती. राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी, पक्षातील तळागाळातील कार्यकर्त्यांना आपलेसे वाटणारे नेते म्हणून अतुल सरपोतदार यांची ओळख होती. पक्षातील शेवटच्या कार्यकर्त्याशी संपर्क साधणे आणि त्या मुख्य प्रवाहात सामील करून घेणे हे त्यांनी शिवसेनेत असताना केले आणि तसेच त्यांनी मनसेतही काम केले.
पक्ष बांधणी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती, ती त्यांनी चांगल्या पद्धतीने पार पाडली.
अत्यंत कमी वयात त्यांचे निधन झाल्याने मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून हळहळ व्यक्त होत आहे.
व्हिडिओ पाहा- •
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, December 26, 2013, 20:35