Last Updated: Thursday, August 23, 2012, 22:26
www.24taas.com, मुंबई मुंबईचे पोलिस आयुक्त अरुप पटनाईक यांची बदली करुन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांना मोठे करीत आहेत, असा आरोप समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केला आहे.
राज ठाकरे यांच्यासह भाजप व शिवसेनेने मुंबईत सीएसटीत हिंसाचार झाल्यानंतर गृहमंत्री आर. आर. पाटील आणि पोलिस आयुक्त अरुप पटनाईक यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी लावून धरली होती.
तसेच या दोघांच्या मागणीसाठी राज ठाकरे यांनी मंगळवारी गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा भव्या महामोर्चा काढला होता. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारवर मोठा दबाव वाढल्याचे सांगण्यात येत आहे.
First Published: Thursday, August 23, 2012, 22:24