Last Updated: Monday, October 29, 2012, 14:07
www.24taas.com, मुंबईचालत्या लोकलमध्ये एका महिलेनं गोंडस चिमुकलीला जन्म दिलाय. रविवारी रात्री कांजुरमार्ग आणि घाटकोपर दरम्यान लोकलमध्ये चिमुकलीचा जन्म झालाय.
सीएसटीकडे जाणाऱ्या लोकलमधून ही महिला प्रवास करत होती.. त्यावेळी अचानक या महिलेच्या अचानक पोटात दुखू लागलं. मात्र लोकलमधल्या महिलांनी मदत केल्याने या चिमुकलीचा लोकलमध्ये जन्म झाला. कुर्ला स्थानकात रेल्वे पोलिसांनी स्ट्रेचर आणि अँम्बुलन्सची तयार ठेवली होती. त्यानंतर या महिलेला लगेच राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
दरम्यान ही महिला आणि चिमुकली दोघीही सुखरुप आहे.. या महिलेच्या पतीनं लोकलमधल्या महिला प्रवासी आणि पोलिसांचे आभार मानले.
First Published: Monday, October 29, 2012, 13:58