Last Updated: Thursday, October 25, 2012, 11:42
www.24taas.com,मुंबईमुंबईतल्या बी.जे.वाडिया हॉस्पिटलमधून एक दिवसाचं बाळ चोरी होण्याची घटना घडलीय.मुंबईतील हॉस्पीटलमधून बाळ होण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
बाळाची आई जास्मिन नाईक हिला सोमवारी वाडिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं मंगळवारी त्यांनी एका मुलाला जन्म दिला. बुधवारी संध्याकाळी जास्मिन फिरायला म्हणून बाहेर पडल्या नेमकी तिच संधी साधत त्यांचं बाळ चोरण्यात आलं.
परळ येथील वाडिया रुग्णालयातून बाळ चोरण्याऱ्या महिलेने नारंगी रंगाची साडी परिधान केली आहे. तर ती महिला कृष्ण वर्णीय आहे. बाळ चोरीला गेल्यामुळे खळबळ उडाली असून वाडिया रुग्णालयात सीसी टीव्ही कॅमेरेही नसल्याने मूल चोरणार्याळ महिलेचा शोध कसा घ्यायचा, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.
जास्मिन ही प्रसूतीसाठी परेल-भोईवाडा येथील तिच्या माहेरी आली होती. तिचे हे पहिलेच मूल होते. तिचे पती देवदास मूल होणार या आनंदात दुबईहून कुरिअरची नोकरी सोडून मुंबईत आला होता. बाळ चोरीला गेल्यामुळे दोघांवरही दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
यापूर्वी शीव, व्ही. एन. देसाई आणि कामा रुग्णालयात मूल चोरीला गेल्याच्या घटना घडल्या होत्या. या वॉर्डातील एका रुग्णाचे नातेवाईक देवदास सोनके यांनी या महिलेला पाहिले. याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली आहे.
याप्रकरणी जास्मिन यांनी पोलिसात तक्रार दाखल केलीय. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार एका २५वर्षीय संशयित महिलेचं स्केच पोलिसांनी जारी केलीय.
First Published: Thursday, October 25, 2012, 11:32