Last Updated: Friday, September 13, 2013, 17:12
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई मुंबईतील हाजी अली इथून गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास अवघ्या चार महिन्यांचं मूल चोरीला गेलं होतं... पोलिसांनी या चिमुकल्याला अवघ्या १२ तासांत शोधून काढलंय आणि बाळ चोरणाऱ्या महिलेलाही अटक केलीय. त्यामुळे पोलिसांचं सर्वत्र कौतुक होत आहे.
शबनम नवाच्या महिलेनं हे मुलं चोरलं होतं. बाळ घरात नसल्याचं समजताच पालकांनी बाळ चोरीला गेल्याची तक्रार गावदेवी पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली. तक्रार मिळाल्यावर लगेचच पोलीस कामाला लागले. तातडीनं मूल शोधण्यासाठी सात पथक ठिकठिकाणी रवाना केली गेली.
शबनम शेख ही महिला हे मूल चोरी करुन उत्तर प्रदेशला जाणार असल्याची माहिती पोलिसांना तपासादरम्यान मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी भायखळा ते कुर्ला टर्मिनसचा सर्व परिसर पिंजून काढायला सुरुवात केली आणि अखेर कुर्ला टर्मिनसवर चोरटी महिला बाळासह पोलिसांच्या तावडीत सापडली.
पोलिसांनी बाळाला आपल्या ताब्यात घेतलं आणि सुखरुप पालकांच्या स्वाधीन केलं. यामुळे अवघ्या १२ तासांत ही कामगिरी करणाऱ्या पीएसआय सुनिल माने यांचं सगळीकडेच कौतुक होतंय. त्यांना योग्य पुरस्कार मिळावा यासाठी पोलीस कमिशनर सत्यपाल सिंह यांच्याकडेही शिफारस करण्यात आलीये.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, September 13, 2013, 17:12