Last Updated: Sunday, November 11, 2012, 00:57
www.24taas.com, मुंबईमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, बाळासाहेबांची प्रकृती स्थिर आहे.. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसचं त्यांनी नुकतच सूपही घेतलं आहे, आणि फळंही घेतील. त्यामुळे बाळासाहेबांच्या प्रकृतीबाबत काळजीचं कारण नाही. तसेच याबतीत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. कोणीही अफवा पसरवू नये. अशी विनंती राज ठाकरे यांनी केली आहे.
राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे की, बाळासाहेबांची प्रकृती ठीक आहे. बाळासाहेब यांच्यावर उपचार सुरू आहेत, तसेच मातोश्रीवर डॉक्टराचं पथकही आहे. त्यामुळे काळजीचं कारण नसल्याचे राज यांनी स्पष्ट केले आहे. बाळासाहेबांना गेल्या काही दिवसांपासून श्वासोच्छावासाचा त्रास जाणवत होता.
त्यामुळे गेल्या काही दिवसात त्यांच्या प्रकृतीत सतत चढ-उतार होत होते. मात्र आता सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. तसेच काल संध्याकाळी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनीही बाळासाहेबांची भेट घेतली.
First Published: Sunday, November 11, 2012, 00:50