बाळासाहेब ठाकरे यांचा १७ नोव्हेंबरला पहिला स्मृतीदिन , Bal Thackeray smrtidin

बाळासाहेब ठाकरे यांचा १७ नोव्हेंबरला पहिला स्मृतीदिन

बाळासाहेब ठाकरे यांचा १७ नोव्हेंबरला पहिला स्मृतीदिन
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा येत्या १७ नोव्हेंबरला पहिला स्मृतीदिन आहे. यानिमित्ताने शिवाजी पार्कवरील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करण्यासाठी लाखो शिवसैनिक तसेच व्हीआयपी शिवाजी पार्कवर येणार आहेत. त्यामुळे तेथील सुरक्षा तसेच अन्य व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी शिवसेना नेते, मुंबईचे महापौर, महापालिका आयुक्त आणि पोलीस अधिका-यांची महत्त्वपूर्ण बैठक आज महापौर बंगल्यात पार पडली.

बाळासाहेब ठाकरे यांची प्राणज्योत १७ नोव्हेंबर २०१२ रोजी मालवली. दुपारी ३.३० वाजता बाळासाहेब ठाकरे यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ८७ व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं. बाळासाहेबांच्या निधनामुळे त्यांच्या चाहत्यांसह संपूर्ण महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगरच कोसळला.

बाळासाहेबांच्या अंत्ययात्रेला अलोट गर्दी लोटली होती. त्यांचा पहिला स्मृतीदिन असल्याने शिवाजी पार्कवर गर्दी होईल, या पार्श्वभूमीवर स्मृतीस्थळाला अभिवादन करण्यासाठी लाखो शिवसैनिक तसेच व्हीआयपी शिवाजी पार्कवर येणार आहेत. त्यामुळे तेथील सुरक्षा तसेच अन्य व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी ही बैठक झाली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, November 6, 2013, 20:09


comments powered by Disqus