Last Updated: Thursday, November 1, 2012, 17:32
www.24taas.com, मुंबई पाकिस्तानी क्रिकेट टीम भारताच्या दौऱ्यावर प्रखर टीका करत शिवसेनेने म्हटलं आहे की, देशासाठी ही अत्यंत शरमेची गोष्ट आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी म्हंटलय की, `पाकिस्तानी टीम दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि बंगळुरू मध्ये मॅच खेळणार आहे. आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांनी त्या शहरांवर हल्लाही केला आहे. सामना या आपल्या मुखपत्रातून बाळासाहेबांनी टिकास्त्र सोडलं आहे. पाकिस्तानी खेळाडूंचे पाऊल महाराष्ट्राच्या भूमीवर तर नाही पडणार मात्र देशातील या राज्यात त्यांचा दौरा होणं ही अत्यंत शरमेची गोष्ट आहे.
बाळासाहेबांनी बीसीसीआयवर देखील निशाणा साधला. पैशासाठी बीसीसीआयने देशाशी गद्दारी केली आहे, आणि आपले खेळाडू त्यांना साथसोबत करीत आहेत. २६/११ आणि संसदेवरील हल्ला याचा विचार करता पाकिस्तानसोबत खेळणं म्हणजे या घटनेत शहीद झालेल्या जवानांचा अपमानच आहे.
बाळासाहेबांनी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावरही टीका केली. पाक दौऱ्याला परवानगी देऊन पाकिस्तानसाठी आपल्या सेवा खुल्या केल्या आहेत. असा टोमणाही शिंदेंना मारला. कपिलदेव आणि सुनील गावसकर यांच्या व्यतिरिक्त कोणीही पाकिस्तानच्या दौऱ्याला विरोधी केला नाही. याबाबत बाळासाहेब प्रचंड नाराज आहेत.
First Published: Thursday, November 1, 2012, 17:17