बिहारी नेत्यांवर बाळासाहेब कडाडले balasaheb`s rage on bihari leaders

बिहारी नेत्यांवर बाळासाहेब कडाडले

बिहारी नेत्यांवर बाळासाहेब कडाडले
www.24taas.com, मुंबई

बिहारी नेत्यांच्या विरोधात ठाकरे कुटुंबीय एकवटले आहेत. सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भूमिकेचे जोरदार समर्थन केलंय. तसंच बिहारी नेत्यांचा चांगलाच समाचार घेतलाय. दिग्विजय सिंग हे काँग्रेसमधील तमाशातील बिनपैशाचे नाचे असल्याची खरमरीत टीका केलीय.

बाळासाहेबांनी बिहारी नेत्यांचा समाचार घेताना म्हटले आहे की सध्या काही लोक विनाकारण बिहारचा नगारा वाजवत आहेत. त्यालमध्येय बिहारचे बिनकामाचे नेते असो किंवा काँग्रेसी तमाशात फुकटात नाचणारे नर्तक दिग्गीराजा. बिहारच्या पुढार्यांआनी तोंडाची डबडी वाजवू नयेत. नाहीतर ‘ठाकरे’ हे बिहारचे नसून अस्सल महाराष्ट्राचे व शिवरायांच्या रक्तामांसाचेच आहेत हे दाखवून द्यावे लागेल, असा इशारा बाळासाहेबांनी दिला आहे.

बिहारी नेते मुस्लिम व्होट बँकेवर डोळा ठेवूनच बडबड करत आहेत. नितीश कुमारांनी अशा फडतूस वादात पडू नये, असा सल्ला बाळासाहेबांनी दिला आहे. आझाद मैदानातील दंगलीचा गुन्हेगार अब्दुल कादीर बिहारमध्येच का लपला? बिहार हे देखील याच देशातील राज्य आहे ना? मग तेथून आतंकवादी पकडून आणायला सीमावाद का निर्माण होतो? असा खडा सवालही त्यांनी विचारला आहे.

First Published: Monday, September 3, 2012, 11:52


comments powered by Disqus