पंतप्रधानांवर बाळासाहेबांचा ठाकरी आसूड Balasaheb slams PM

पंतप्रधानांवर बाळासाहेबांचा ठाकरी आसूड

पंतप्रधानांवर बाळासाहेबांचा ठाकरी आसूड
www.24taas.com, मुंबई

पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पुन्हा एकदा आगपाखड केलीय. पैसे झाडाला लागत नाहीत पण घोटाळे आणि भ्रष्टाचाराची झाडे काँग्रेस राजवटीत सर्वत्र उगवली आहेत त्याचे काय ? असा सवाल बाळासाहेबांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून केलाय.

डिझेल महाग करून सरकारने गोरगरिबांच्या चुली विझवल्या. वरून पंतप्रधान म्हणतात `माझे हात मजबूत करा` पैसा झाडाला लागत नाही हे बरोबर; मग पैसा कोळसा खाणीत उगवतो का ? गुरांच्या चाऱ्यात उगवतो का ? बोफोर्समध्ये उगवतो का ? 2G आणि कॉमनवेल्थ खेळात उगवतो काय? की रॉबर्ट वढेरांच्या घरात उगवतो ? असा खडा सवाल बाळासाहेबांनी केला आहे.

मनमोहन सिंग हे स्वयंभू अर्थतज्ज्ञ असतील. याचा अर्थ असा नव्हे की, देश चालविण्याची त्यांच्यात क्षमता आहे. गांधी परिवार देश लुटत आहे आणि मनमोहन सिंग तो पैसा सामान्य जनतेकडून वसूल करीत आहेत. पैसा झाडाला लागत नाही, पण घोटाळे आणि भ्रष्टाचाराची झाडे काँग्रेस राजवटीत सर्वत्र उगवली आहेत आणि त्याची मुळे खोलवर पसरली आहेत, असं म्हणत बाळासाहेबांनी पंतप्रधानांवर ‘ठाकरी आसूड’ ओढले आहे.

First Published: Monday, September 24, 2012, 11:57


comments powered by Disqus