बाळासाहेबांचा प्रथम स्मृतीदिन : शिवतीर्थावर शिवसागर!, balasaheb thackeray`s first death anniversary

बाळासाहेबांचा प्रथम स्मृतीदिन : शिवतीर्थावर शिवसागर!

बाळासाहेबांचा प्रथम स्मृतीदिन : शिवतीर्थावर शिवसागर!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मराठी मनावर अधिराज्य गाजवणारे, प्रखर हिंदूत्वाचे स्फुल्लिंग चेतवणारे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज प्रथम स्मृतिदिन... ज्या शिवतीर्थावर शिवसेनाप्रमुखांनी अनेक ऐतिहासिक सभा घेतल्या त्या शिवतिर्थावर शिवसेना प्रमुखांची स्मृती जपणाऱ्या स्मृतिउद्यानाच्या दर्शनासाठी शिवसेनाप्रमुखांना मानवंदना देण्यासाठी आज शिवसागर उसळायला सुरुवात जालीय.

देशाच्या इतिहासात गेल्या पाच दशकांपासून घोंघावणारं हे वादल मागील वर्षी १७ नोव्हेंबरला शांत झालं. याच बाळासाहेबांचे असंख्य मावळे आज पुन्हा त्यांच्या ओढीनं राज्यभरातून शिवाजी पार्कात दाखल होण्यास सुरूवात झालीय. बाळासाहेबांच्या आठवणींनी आज पुन्हा शिवाजी पार्कचा परिसर भरून जाणार आहे. आपल्या भावनांना अश्रूंना वाट मोकळी करून देणार आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पहिल्या स्मृतीदिनी शिवाजीपार्कवर शिवसेनेकडून तयारी करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून येणाऱ्या शिवसैनिकांना इथं बाळसाहेबांना अभिवादन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर अन्य पक्षातील नेतेही यावेळी उपस्थित राहणार आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, November 17, 2013, 08:46


comments powered by Disqus