बीड जिल्हा बँक घोटाळा : धनंजय मुंडेंना एक कोटीचा धक्का, beed district bank scam : flick to dhanjay munde

बीड जिल्हा बँक घोटाळा : धनंजय मुंडेंना एक कोटीचा धक्का

बीड जिल्हा बँक घोटाळा : धनंजय मुंडेंना एक कोटीचा धक्का

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

बीड जिल्हा बॅँक कर्ज थकबाकी प्रकरणात धनंजय मुंडे यांना मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं दणका दिलाय.

धनजंय मुंडे यांनी १२ कोटी कर्जाच्या व्याजाचे एक कोटी रुपये उद्या म्हणजेच मंगळवारी भरण्याचे आदेश कोर्टानं दिलेत. या प्रकरणी पुढील सुनावणी २३ तारखेला होणार आहे. याप्रकरणी धनंजय मुंडे यांनीच आपल्यावरील गुन्हा मागे घेण्यासाठी याचिका दाखल केली होती.

२००८ मध्ये ‘आदित्य’ बहुउद्देशीय संस्था बीड, श्रीमती मल्लवाबाई वल्याळ डेंटल कॉलेज सोलापूर, व्यंकटेश्वर अँग्रो प्रोडक्ट्स, जय भवानी सहकारी साखर कारखाना, खंड औद्योगिक बहुउद्देशीय संस्था आणि गजानन सहकारी साखर कारखाना या सर्व संस्थेला मिळून बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य शाखेतून ३५ कोटी ३८ लाख रुपयांचे कर्ज तत्कालीन संचालकांनी मंजूर केले होते. मात्र, हे कर्जमुदतीत बँकेत भरले गेले नाहीत. बँकेच्या अधिकाऱ्यांनी सदर कर्जांच्या कागदपत्रांची खातरजमा केली असता हे सर्व कर्ज विनातारण आणि बोगस कागदपत्रांच्या आधारावर देण्यात आल्याचं उघड झालं होतं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, October 21, 2013, 17:34


comments powered by Disqus