मुंबईच्या बीअर बारमध्ये गुप्त तळघर, Beer Bar in Mumbai Intelligence door, cellar!

मुंबईच्या बीअर बारमध्ये गुप्त तळघर

मुंबईच्या बीअर बारमध्ये गुप्त तळघर
www.24taas.com, मुंबई
मुंबईत बीअर बारमध्ये छापा ही एक सामान्य गोष्ट आहे, जो आठवड्यातून एक दोनदा होत असते. पण बीअर बारमध्ये पानाचं दुकान, एक गुप्त दरवाजा आणि तळघर असल्याची गोष्ट समोर आली तर सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसणे सहाजिक आहे. मुंबईत एका बीअर बारमध्य अशा सर्व गोष्टी आढळल्या आणि त्या ठिकाणी बारबाला अश्लिल डान्स करीत होत्या आणि याची मुंबईच्या पोलिसांना माहितीच नव्हती.

मुंबईत दहिसरमध्ये पोलिसांनी एका बारवर छापा टाकत बारबालांसह 65 जणांना ताब्यात घेतलं. यात सात मुलींचाही समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे बारमालकाने बारबालांना लपविण्यासाठी हॉटेलमध्येच एक तळघर तयार केल्याचं उघड झालंय. त्यामुळे या बारबालांना शोधण्यासाठी पोलिसांना बरीच कसरत करावी लागली.
मुंबईच्या बीअर बारमध्ये गुप्त तळघर


अखेर बारबालांना तळघरात लपवण्यात आल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. M 4 U या नावाच्या या बारमध्ये अश्लिल डान्स आणि अवैध धंदे चालत असल्याची कुणकूण पोलिसांना लागली होती. या कारवाईत बारच्या कर्मचा-यांसह ग्राहकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

First Published: Friday, March 15, 2013, 12:13


comments powered by Disqus