Last Updated: Wednesday, April 2, 2014, 17:07
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई अखेर बेस्ट कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन दुसऱ्या दिवशी मागे घेतलंय. राज्याच्या मुख्य सचिवांनी ही घोषणा केलीय.
राज्याचे मुख्य सचिव, बेस्ट प्रशासन आणि बेस्ट कर्मचारी युनियनचे नेते यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या ड्युटी शेड्युलमध्ये आवश्यक ते बदल करुन एक जूनपासून नव्या कॅनेडियन ड्युटी शेड्युलची अंमलबजावणी करण्यात येईल, असा समझौता या बैठकीत निघालाय. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून टांगणीला लागलेला मुंबईकरांचा जीव अखेर भांड्यात पडलाय.
दरम्यान, सलग दुसऱ्या दिवसीही बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरु राहिल्यामुळे दुपारपर्यंत बेस्टच्या प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. ४० ते ४५ लाख प्रवाशांना या संपाचा फटका बसला. बेस्टच्या मुंबईसह उपनगरात सुमारे साडे चार हजार गाड्या धावतात. मात्र, बेस्ट बंद असल्यामुळे टॅक्सी चालकांकडून मुंबईकरांची चांगलीच लूट होताना दिसून आली. प्रवाशांकडून टॅक्सी चालकांनी दुप्पट भाडं वसूल केलं.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. •
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, April 2, 2014, 17:06