Last Updated: Friday, February 1, 2013, 17:58
www.24taas.com, मुंबई
बेस्ट उपक्रमाच्या नोकर भरतीत खेळाडूंना दोन टक्के आरक्षण देण्याची शिवसेनेची मागणी बेस्ट प्रशासनाने आज मंजूर केली. त्यामुळे बेस्टच्या आगामी नोकर भरतीत खेळाडूंना आरक्षण ठेवण्यात येणार आहे.
बेस्ट दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमावर बेस्ट समितीत हा सादर केला. बेस्ट कामगार सेनेचे सरचिटणीस सुनिल गणाचार्य यांनी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी बेस्टच्या नोकर भरतीत दोन टक्के जागा राखीव ठेवण्याची मागणी केली.
शिवसेनेचे सदस्य रंजन चौधरी यांनी या मागणीला पाठिंबा दिला. त्यावर बेस्टचे महाव्यवस्थापक ओ.पी. गुप्ता यांनी खेळाडूंना नोकर भरतीत सामावून घेण्याचे राज्य सरकारचे धोरण काय आहे हे तपासून आगामी नोकर भरतीत खेळाडूंना दोन टक्के आरक्षण ठेवण्यात येईल. त्यासाठी बेस्ट समितीत प्रस्ताव आणणार असल्याचे स्पष्ट केले.
First Published: Friday, February 1, 2013, 17:58