नरेंद्र मोदी आणि भरत शहा एकाच व्यासपीठावर!, bharat shah & narendra modi share same stage

नरेंद्र मोदी आणि भरत शहा एकाच व्यासपीठावर!

नरेंद्र मोदी आणि भरत शहा एकाच व्यासपीठावर!

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुंबईतल्या हिरे व्यापाऱ्यांच्या कार्यक्रमात गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी जोरदार भाषण केलं खरं, मात्र या कार्यक्रमात वादग्रस्त हिरे व्यापारी भरत शहा यांची व्यासपीठावरची उपस्थिती चर्चेचा विषय ठरलीय.

नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे असलेल्या या कार्यक्रमात अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप असलेले हिरा व्यापारी भरत शहा हे भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या शेजारी बसले होते. गुन्हेगारी जगताशी संबध असल्याच्या आरोपांवरून भरत शहा यांना यापूर्वी जेलची हवा खावी लागली होती.

अनेक सिनेमांचे फायनान्सर असलेले भरत शहा यांचे गुन्हेगारी जगताशी संबंध असल्याच्या कारणामुळे एक वर्षांची शिक्षा ठोठावली होती.


व्हिडिओ पाहा -

First Published: Tuesday, October 1, 2013, 09:49


comments powered by Disqus