बाळासाहेबांच्या स्मृतीउद्यानाचं भूमीपूजन `उरकलं`! Bhoomi pujan of Balasahab`s Memorial in Uddhav Thackeray`s absence

बाळासाहेबांच्या स्मृतीउद्यानाचं भूमीपूजन `उरकलं`!

बाळासाहेबांच्या स्मृतीउद्यानाचं भूमीपूजन `उरकलं`!
www.24taas.com, मुंबई

दादरच्या शिवाजी पार्कमध्ये होणा-या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या बहुचर्चित स्मृती उद्यानाचा मुद्दा अखेर धसास लागलाय. मात्र यावेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मात्र उपस्थित नव्हते.

कोणताही गाजावाजा न करता आज दुपारी एक वाजेच्या सुमारास बाळासाहेबांच्या स्मृती उद्यानाचं भूमीपूजन उरकण्यात आलं. भूमीपूजनाच्या कार्यक्रमाला महापौर सुनील प्रभू, शिवसेना नेते दिवाकर रावते, स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे, सभागृह नेते यशोधर फणसे आणि मिलिंद नार्वेकर यांच्यासह महापालिकेचे विभागीय अधिकारी उपस्थित होते.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाळासाहेबांच्या स्मारकावरून चर्चेला तोंड फोडणारे शिवसेनेचे नेते मनोहर जोशी, संजय राऊत हे मात्र भूमीपूजनाला दिसले नाहीत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही अनुपस्थितहोते. ते परदेशात असल्याचं सांगण्यात आलं.

First Published: Wednesday, February 6, 2013, 18:54


comments powered by Disqus