मुंबईच्या स्वच्छतेसाठी `बिग बी होणार टीचर`.... , Big B want to teacher for clean Mumbai

मुंबईच्या स्वच्छतेसाठी `बिग बी होणार टीचर`....

मुंबईच्या स्वच्छतेसाठी `बिग बी होणार टीचर`....
www.24taas.com, मुंबई

बिग बी अमिताभ बच्चन मुंबईकरांना स्वच्छतेचा संदेश देणार आहे. मुंबई महापालिकेच्या स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानाचा बिग बीच्या हस्ते शुभारंभ होणार आहे.

मुंबई महापालिका हद्दीतल्या झोपडपट्टी परिसरातल्या स्वच्छतेसाठी ही मोहीम हाती घेण्यात येणार आहे. महापौर सुनील प्रभू यांच्या निवासस्थानी या प्रबोधन मोहीमेचा शुभारंभ होणार आहे. दुसरीकडं अमिताभ महापालिकेच्या विद्यार्थ्यांशीही संवाद साधणार आहे.

व्हर्च्युअल क्लासच्या माध्यमातून अमिताभ चारशे शाळांतील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे. दादर पूर्वेतल्या बीएमसी शाळेत उभारण्यात आलेल्या नव्या स्टुडिओतून अमिताभ हा क्लास घेणार आहे.

First Published: Wednesday, January 23, 2013, 16:05


comments powered by Disqus