जखमी `बिजली`चा अखेर मृत्यू!, bijli died on mulund road

जखमी `बिजली`चा अखेर मृत्यू!

जखमी `बिजली`चा अखेर मृत्यू!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

अखेर बिजली हत्तीणीनं सगळ्यांना अलविदा केलाय. काही दिवसांपासून बिजलीचं वजन अव्वाच्या सव्वा पटीनं वाढलं होतं. तसंच तिची प्रकृतीही खराब झाली होती. मागच्या महिनाभरापासून बिजलीवर मुलुंडमध्ये उपचार सुरु होते. पण, आज मात्र तिनं उपचारांना प्रतिसाद देणं थांबविलं आणि या जगाचा कायमचा निरोप घेतला.

गेल्या तीन आठवड्यांपासून जखमी अवस्थेत बिजली मुलुंडच्या फॉर्टीस हॉस्पीटलजवळ रस्त्यावर पडलेल्या अवस्थेत होती. तिच्या पायाला दुखापत झाली होती त्यामुळे तिला चालताही येत नव्हतं. त्यामुळे तिला क्रेनच्या साहाय्यानं उभं करून जवळच्याच रिकाम्या जागेवर हलवण्यात आलं आणि तिच्यासाठी तिथंच तात्पुरता निवारा बांधण्यात आला. परंतू, जंतूसंसर्ग झाल्यानं बिजली आजार आणखी बळावला.

बिजलीवर उपचार करण्यासाठी भारतातील अनेक स्पेशालिस्ट डॉक्टर्सना बोलावण्यात आलं. बिजलीच्या उपचारासाठी अनके एनजीओ आणि प्राणीमित्रांनी मदतही केली. बिजलीचा आजार बरा व्हावा यासाठी प्राणीप्रेमींनी शिकस्त केली. मात्र, त्यांचे प्रयत्न तोकडे ठरले. आज पहाटे बिजलीचा मृत्यू झाला. बिजलीच्या मृत्यूमुळं सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येतेय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, June 30, 2013, 10:33


comments powered by Disqus