त्याच्या धूम स्टाईलने तिचा जीव घेतला, bike stunt : lady dead in mumbai

त्याच्या धूम स्टाईलने तिचा जीव घेतला...

त्याच्या धूम स्टाईलने तिचा जीव घेतला...

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

धूम स्टाईलनं बाईक चालवणं एका निष्पाप महिलेच्या जीवावर बेतलंय.

वडाळ्यात बाईकचे स्टंट करताना मोहम्मद कुरेशी या बाईकस्वाराचं बाईकवरील नियंत्रण सुटलं आणि त्याची भरधाव बाईक फूटपाथ वरील एका झोपडीत घुसली. या अपघातात झोपडीत झोपलेली तीन मुले आणि संता वाघेला ही महिला जबर जखमी झाली. त्यांना उपचारासाठी केईएम मध्ये दाखल करण्यात आलं. मात्र, तेथे संता वाघेला हिला मृत घोषित करण्यात आलं. तर तीनही मुलांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.


बाईकस्वार मोहम्मद कुरेशी यालाही या अपघातात गंभीर दुखापत झालीय. पोलीस तपासात या बाईकस्वाराकडे लाईसन्स नसल्याचं उघड झालंय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, October 3, 2013, 10:41


comments powered by Disqus