वहिनीचे अश्लील फोटो फेसबुकवर अपलोड करणाऱ्या दिरास अटक, BIL uploads vulgar pics of SIL on facebook

वहिनीचे अश्लील फोटो फेसबुकवर अपलोड करणाऱ्या दिरास अटक

वहिनीचे अश्लील फोटो फेसबुकवर अपलोड करणाऱ्या दिरास अटक
www.24Taas. com, झी मीडिया, मुंबई

एका विकृत दिराने आपल्याच वहिनीचे अश्लील फोटो फेसबुकवर अपलोड केले. या आरोपीला अटक करण्यात आलं आहे. विजय पांचाळ असं या आरोपीचे नाव असून त्याचं वय ४३वर्षं आहे. वहिनीने भावाशी घटस्फोट घेऊन दुसऱ्या पुरूषाशी लग्न केल्याचा राग म्हणून त्याने हे कृत्य केल्याचं सांगण्यात येत आहे.

संबंधित महिला घटस्फोटित असून आपल्या दुसऱ्या पतीसोबत गोरेगाव येथे राहते. फेसबुकवर बनावट अकाऊंट तयार करून आपले अश्लीनल फोटो टाकल्याचे ऑगस्ट 2013 मध्ये तिच्या लक्षात आले. त्यानुसार तिने मुंबई पोलिसांच्या सायबर सेल विभागाकडे तक्रार नोंदविली. याप्रकरणी तपास करीत असताना पुणे येथून हे फोटो अपलोड झाल्याचे लक्षात येताच गोरेगाव पोलिसांनी पुण्यात जाऊन पांचाळला अटक केली.

महिला २००९ पर्यंत आपल्या पहिल्या पतीसोबत पुण्यात राहत होती; मात्र त्यांच्यात वाद झाल्यामुळे ती माहेरी आली. 2011 मध्ये दोघांत पुन्हा समेट झाल्यानंतर पुण्यात सुनील गुप्ता यांच्याकडे ती अकांउंटंटचं काम करत होती. एका पार्टीमध्ये तिच्या बॉसने तिला कोल्ड ड्रिंकमधून ड्रग्ज देऊन तिचे अश्ली्ल फोटो काढून तिच्याच नवऱ्याला पाठवले. याविरोधात तक्रार केल्यानंतर गुप्ताला अटक झाली होती. त्यानंतर ते फोटो महिलेच्या पहिल्या पतीकडून मिळवून पांचाळ याने फेसबुकवर टाकल्याची कबुली पोलिसांना दिली असल्याचे गोरेगाव पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी चौकशी सुरू असून, पांचाळच्या भावालाही अटक होण्याची शक्यगता पोलिसांनी वर्तविली आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, October 31, 2013, 16:15


comments powered by Disqus