Last Updated: Wednesday, May 8, 2013, 18:42
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईसीमा भागातील मराठी जनतेवर अन्याय करणारी सत्ता गेली, याचा शिवसेनेला आनंद असल्याची प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून मराठी माणसांवर कर्नाटकातील सरकार अन्याय करीत आहे. त्यामुळे असे सरकार पायउतार झाले, याचा मला आनंद आहे. परंतु, मी भाजपच्या विरोधात बोलतोय असे नाही. आम्ही रालोआतील घटक पक्ष आहोत. आणि राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
एका निकालावरून आगामी निवडणूकीचा अंदाज बांधणे योग्य होणार नाही. आगामी काळात ज्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत. त्या ठिकाणी भाजप सत्तेवर येईल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
कर्नाटक निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीला दोन जागा मिळाल्या याचाही आनंद आहे, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, May 8, 2013, 18:24