INS कोलकाता युद्धनौकेत स्फोट, एका अधिकाऱ्याचा मृत्यूBlast in under-construction warship in Mumbai, o

INS कोलकाता युद्धनौकेत स्फोट, एका अधिकाऱ्याचा मृत्यू

INS कोलकाता युद्धनौकेत स्फोट, एका अधिकाऱ्याचा मृत्यू
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुंबईमध्ये माझगाव डॉक इथं आयएनएस कोलकाता जहाजामध्ये स्फोट झालाय. माझगाव डॉकच्या यार्ड ७०१ मध्ये गॅस गळतीमुळं हा स्फोट झालाय. यामध्ये एका नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू झाला असून, काही माझगाव डॉक कर्मचारी जखमी झालेत. सर्व जखमींना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आलेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्फोटानंतर युद्धनौकेत आग लागली. आग लागण्याच्या कारणांबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही. मात्र गॅसगळती मुळं काही अधिकारी बेशुद्ध झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. INS कोलकाता लवकरच नौदलात सहभागी करण्यात येणार होतं.

काही दिवसांपूर्वी मुंबईजवळच पानबुडी आयएनएस सिंधुरत्नच्या झालेल्या अपघातात दोन अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेची नैतिक जबाबदारी घेत नौसेनेचे प्रमुख अॅडमिरल डी. के. जोशी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. मागील सात महिन्यात भारतीय नौसेनेच्या दहा युद्धनौका आणि तीन पानडुब्या दुर्घटनाग्रस्त झालेल्या आहेत.

या सर्व घटनांमुळे भारतीय नौदलाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, March 7, 2014, 16:26


comments powered by Disqus