बोम्बार्डीअर कंपनीची नवी लोकल मुंबईकडे रवाना!bombardier india`s New local Train For Mumbai depart from Chennai

बोम्बार्डीअर कंपनीची नवी लोकल मुंबईकडे रवाना!

बोम्बार्डीअर कंपनीची नवी लोकल मुंबईकडे रवाना!
www.24taas.com , झी मीडिया, मुंबई

एमयुटीपी-२ प्रकल्पाअंतर्गत मुंबईसाठी एक नवी लोकल गाडी तयार झालीय. बोम्बार्डीअर कंपनीच्या टेक्नोलॉजीनुसार ही गाडी चेन्नईच्या रेल्वे कोच फॅक्टरीत तयार झाली.

ही गाडी लवकरच मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. ८ ते १० दिवसात ही गाडी मुंबईत पोहोचेल, त्यानंतर २ महिने तिच्या विविध चाचण्या घेतल्या जातील. डिसेंबर ते जानेवारीमध्ये पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात ही गाडी दाखल होईल.

सध्या अस्तित्वात असलेल्या सिमेन्सच्या लोकलपेक्षा ही गाडी वेगळी आहे. स्टेनलेस स्टीलची बॉडी असलेल्या या गाडीत जास्त जागा आहे. तसंच व्हेंटिलेशनची सोयही जास्त चांगली आहे. येत्या वर्षात ही अशा ७२ गाड्या पश्चिम आणि मध्य रेल्वेला उपलब्ध होणार आहेत.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, October 2, 2013, 15:14


comments powered by Disqus