फेसबुकवर राज ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह मजकूर, तरूणाला अटक, Boy arrested for abusing Raj Thackeray on Facebook

फेसबुकवर राज ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह मजकूर, तरूणाला अटक

फेसबुकवर राज ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह मजकूर, तरूणाला अटक
www.24taas.com, पालघर

मनसे अध्यक्ष राज ठाकरें यांच्यावर पालघरमधील एका तरूणाने अश्लील भाषेतील मजकूर फेसबुकवर टाकला आहे. अत्यंत खालच्या पातळीवरील भाषेचा वापर करून राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. पालघरमधील सुनील विश्वकर्मा या तरुणानं फेसबुकवर आगळीक केली आहे. सुनील विश्वकर्मा याला मनसैनिकांनी त्याच्या घरातून पकडून पोलिसांच्या हवाली केलं. सध्या तरूण पोलिसांच्या ताब्यात असून त्याची चौकशी सुरू आहे.

फेसबुकवर राज ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह मजकूर टाकला आहे. मनसैनिकांनी मजकूर टाकणा-या तरुणाला पालघर पोलिसांच्या हवाली केलं आहे. राज ठाकरेंबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याने तरूणाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. एक युवकाला मनसैनिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिलं आलं आहे.

नुकतंच बाळासाहेबांच्या निधनानंतर बंदबद्दल फेसबुकवर स्टेटस टाकणाऱ्या दोन तरूणींन अटक करण्यात आली होती. ह्या प्रकरणाला काही दिवस उलटत नाही तोच आज पुन्हा एकदा पालघर मधील तरूणाला राज ठाकरेंवर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याने अटक करण्यात आली आहे.

First Published: Wednesday, November 28, 2012, 15:26


comments powered by Disqus