मुंबईत तीन ब्रिटीश महिलांची छेडछाड, आरोपी जेरबंद! British woman molested in Mumbai, one held

मुंबईत तीन ब्रिटीश महिलांची छेडछाड, आरोपी जेरबंद!

मुंबईत तीन ब्रिटीश महिलांची छेडछाड, आरोपी जेरबंद!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुंबईत तीन ब्रिटीश महिलांची छेडछाड करण्याची घटना घडलीये. काल संध्याकाळी सहाच्या सुमारास ओशिवारा परिसरात हा प्रकार घडला.

ओशिवरा पोलीस स्थानकात याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तात्काळ आरोपींना जेरबंद केलंय. या तीनही ब्रिटीश महिला चित्रपटात डांन्सर म्हणून काम करतात.

शूटींग संपल्यानंतर त्या रिक्षानं आपल्या घरी परतत असताना मोटारसायकलवरून आलेल्या एका तरूणानं त्यांची छेडछाड करण्यास सुरूवात केली. मात्र या महिलांनी प्रसांगवाधान राखत तातडीनं बीट मार्शल्सकडे याची तक्रार केली आणि आरोपी पळून जाण्यापूर्वीच पोलिसांनी त्याला जेरबंद केलं.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, October 22, 2013, 08:36


comments powered by Disqus