माहिममध्ये इमारतीचा भाग कोसळला Building collapses in Mahim

इमारतीचा भाग कोसळला; चार ठार, पाच जखमी

इमारतीचा भाग कोसळला; चार ठार, पाच जखमी
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

माहीममध्ये कॅडल रोडजवळ आफ्ताब या चार मजली इमारतीचा भाग कोसळलाय. या दुर्घटनेत चार जण ठार तर पाच जण जखमी झालेत. मुंबईत सलग दोन दिवस पाऊस सुरू आहे. पावसाच्या जोरामुळेच बिल्डिंगचा काही भाग पडल्याचा अंदाज आहे.

मुंबईतल्या माहिम परिसरातील छोटा दर्ग्याजवळ चार मजली इमारतीचा काही भाग कोसळला आहे. या अपघातात चार जण ठार तर पाच जण जखमी झाले आहेत. जखमींना भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. इमारतीच्या कोसळलेल्या ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. सध्या मदत आणि बचावकार्य सुरु आहे.

अफ्ताब मॅन्शन असं या इमारतीचं नाव आहे. दोन दिवस झालेल्या पावसामुळे ही इमारत कोसळली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, June 10, 2013, 23:53


comments powered by Disqus