सी-लिंकवर अपघाताला कारण उंदीर..., C-link to the accident rats ...

सी-लिंकवर अपघाताला कारण उंदीर...

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

सागरी सेतूवर शुक्रवारी सकाळी एका उंदरामुळे भरधाव जाणार्या गाड्या १५ मिनिटे खोळंबल्या. उंदराला वाचवण्यासाठी स्विफ्ट कार चालकाने गाडी वळवण्याचा प्रयत्न केल्याने मागून येणारी मर्सिडीझ कार डिव्हायडरला आदळली. सी-लिंकवरील या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. मात्र दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे.

वांद्रे-वरळी सी-लिंक येथून शुक्रवारी सकाळी वांद्रय़ाच्या दिशेने निघालेल्या एका स्विफ्ट कारच्या समोरून एक उंदीर रस्ता ओलांडत असताना चालकाला दिसताच तो चाकाखाली येऊ नये म्हणून स्विफ्ट चालकाने आपल्या कारचे स्टेअरिंग डाव्या बाजूला वळवले. मात्र त्याचवेळी डाव्या बाजूने येणार्याा मर्सिडीझ कारच्या चालकाने देखील अचानक स्टेअरिंग वळवण्याचा प्रयत्न केला. परंतु मर्सिडीझचे स्टेअरिंग लॉक होऊन ती समोरील स्विफ्ट कारवर आदळली.

या अपघातात चालकांना आणि कारमधील कोणत्याही व्यक्तींला कुठल्याही प्रकारची इजा झालेली नाही. दोन्ही कारचे या अपघातात किरकोळ नुकसान झाले असून या अपघातामुळे वांद्रे-वरळी सी-लिंक मार्गावरील वाहतूक १५ मिनिटे खोळंबली होती. वरळी पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन या अपघाताची नोंद केली.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, January 4, 2014, 14:33


comments powered by Disqus