अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ , Cabinet decision Anganwadi workers remuneration,

अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ

अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. राज्यातील 2 लाख 6 हजार कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे.

अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाने घेतला. 1 एप्रिल 2014 पासून अंगणवाडी सेविकांचे मानधन 4050 वरुन 5000 रुपये होणार आहे. अंगणवाडी मदतनीसाचे मानधन 2000 वरुन 2500 रुपये होणार आहे. तर मिनी अंगणवाडी सेविकेला 1950 ऐवजी 2400 रुपये मानधन मिळेल.

अंगणवाडी सेविकांच्या मानधनात 950 रूपये, मदतनीसांच्या मानधनात 500 रूपये, मिनी अंगणवाडी सेविकेच्या मानधनात 450 रूपये एवढी वाढ करण्यात आली आहे. राज्यातील 2 लाख 6 हजार 125 कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. या निर्णयामुळे दरमहा 14 कोटी 75 लाख रूपये व वार्षिक 177 कोटी रूपये इतका अतिरिक्त खर्च येणार आहे.

वस्तीशाळेतील निमशिक्षक प्राथमिक शिक्षक

वस्तीशाळा निमशिक्षकांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये नियमित प्राथमिक शिक्षक म्हणून सामावून घेण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाने घेतला. ज्या वस्तीशाळा स्वयंसेवकांनी किंवा निमशिक्षकांनी डीएड पूर्ण केले आहे, त्यांना प्राथमिक शिक्षकांची वेतनश्रेणी देण्यात येईल. ज्यांनी डीएड पूर्ण केले नाही, त्यांना अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षकांची वेतनश्रेणी मिळेल. ही वेतनश्रेणी शासन निर्णयाच्या दिनांकापासून मिळेल.

यापूर्वीचे कोणतेही लाभ मिळणार नाहीत. प्राथमिक शिक्षक म्हणून सामावून घेतांना त्यांना कमाल वयोमर्यादेची अट राहणार नाही. मात्र, आरक्षणाचे नियम लावण्यात येतील. या निर्णयामुळे 156 कोटी 85 लाख रुपये एवढा वार्षिक खर्च येणार आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, February 23, 2014, 23:36


comments powered by Disqus