Last Updated: Wednesday, February 20, 2013, 16:53
www.24taas.com, मुंबईराज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला आहे. काँग्रेसचे राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश हे मुंबईत दाखल झाले आहेत. ते मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आज मुख्यमंत्र्याची भेट घेणार आहेत.
या भेटीत काँग्रेसच्या कोट्यातल्या तीन रिक्त जागांबाबत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. दोन दिवसांपूर्वीच हायकमांडने राज्य मंत्रिमंडळ विस्ताराला हिरवा कंदील दिल्याचं वृत्त झी 24 तासच्या सुत्रांनी दिलं होतं.
त्यामुळे कॉँग्रेसच्या कोट्य़ातील तीन नवे मंत्री कोण ? याचा फैसला लवकरच होण्याची शक्यता आहे.
First Published: Wednesday, February 20, 2013, 16:53