जगभरातील १४.१ दशलक्ष लोक कॅन्सरच्या विळख्यात, cancer day

जगभरातील १४.१ दशलक्ष लोक कॅन्सरच्या विळख्यात

जगभरातील १४.१ दशलक्ष लोक कॅन्सरच्या विळख्यात
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

४ फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिन म्हणून पाळला जातो. कर्करोगाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय. कर्करोग हा भारतातल्या रुग्णांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरणाऱ्या १० गंभीर रोगांपैकी एक म्हणून ओळखला जातो. दरवर्षी कर्करोग रुग्णांमध्ये आठ ते नऊ लाख एवढ्या संख्येनं भर पडतेय.




कर्करोगाचा विळखा...
* कॅन्सरच्या विळख्यात अवघं जग
* जगभरात १४.१ दशलक्ष लोक कॅन्सरग्रस्त
* ७.४ दशलक्ष पुरुष, ६.७ दशलक्ष महिलांना लागण
* फुफ्फुसाच्या कॅन्सरचं प्रमाण सगळ्यात जास्त
* जगभरात स्तनाच्या कॅन्सरचे १.७ दशलक्ष रुग्ण
* २०११ - भारतात ५,५४,२३४ महिलांना कॅन्सर
* २०११ - भारतात ४,९०,००८ पुरुषांना कॅन्सर
* २०११ - यूपीमध्ये सर्वाधिक कॅन्सर रुग्णांची नोंद, पाठोपाठ महाराष्ट्र आणि बिहारचा क्रमांक


कसा टाळाल कर्करोग?
* समतोल आहार
* व्यसनांना दूर ठेवा
* नियमित करा व्यायाम, कर्करोगाला ठेवा लांब
* लक्षणं आढळल्यास त्वरित, डॉक्टरांशी संपर्क साधा
* शरीराची स्व:तपासणी करा


दरम्यान, कर्करोगासंदर्भात जनजागृती करण्यासाठी आज मुंबईच्या डब्बेवाल्यांनी पुढाकार घेतलेला दिसतोय. दररोज दोन लाख मुंबईकरांच्या संपर्कात येणारे डबेवाले कर्करोग आजार आणि निदान या माहितीविषयक टी-शर्ट घालून डबे पोहचवण्याचं काम करताना दिसत आहेत. शिवाय त्यांच्या प्रत्येक डब्यावरदेखील अशा प्रकारचा एक संदेश लिहिलेला आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, February 4, 2014, 14:00


comments powered by Disqus