कार अपघात : अंधेरीतून ड्रायव्हला अटक, car accident in Andheri, Mumbai

कार अपघात : अंधेरीतून ड्रायव्हला अटक

कार अपघात : अंधेरीतून ड्रायव्हला अटक
www.24taas.com,मुंबई

मुंबईतील अंधेरीत हिट एन्ड रनचं प्रकरणी फरार झालेल्या ड्रायव्हरला वर्सोवा पोलिसांनी अटक केलीये. त्याच्याकडून मर्सिडिझ कारही जप्त करण्यात आलीये.

अंधेरीतल्या लोखंडवाडा संकुलातून मर्सिडिझ कार जप्त करण्यात आलीये. ही कार फाल्गुन श्रॉफ यांच्या मालकीची असल्याचं सांगण्यात येतय. मध्यरात्री जेवणानंतर फिरायला गेलेल्या पाच जणांना आलिशान मर्सिडिज कारनं उडवल होतं. पाचही जण जखमी झालेत.


जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येतय. पाच जणांना उडवणारा कार चालक फरार होता. त्याला पकडण्यात वर्सोवा पोलिसांना यश आलयं. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलयं.

First Published: Monday, February 18, 2013, 13:37


comments powered by Disqus