Last Updated: Sunday, September 9, 2012, 21:18
www.24taas.com, मुंबईमुंबईत व्यंगचित्रकार असीम त्रिवेदी यांना अटक करण्यात आलीय. भारतीय राजमुद्रेसंदर्भात आक्षेपार्ह व्यंगचित्र काढल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. यासंदर्भात बीकेसी पोलिसांनी असिम त्रिवेदीला अटक केलीय.
अण्णांच्या आंदोलनादरम्यान असीम त्रिवेदी यानं आक्षेपार्ह व्यंगचित्र काढलं होतं. भारतीय राजमुद्रेवर असलेल्या चार सिंहांऐवजी त्यांनी चार लांडगे काढले होते, आणि त्यावर ‘भ्रष्टमेव जयते’ असं लिहिलं होतं.
त्यासंदर्भात असिम त्रिवेदींना अटक करण्यात आलीय. असीम त्रिवेदी हे मूळचे उत्तर प्रदेशातले राहणारे आहेत. आणि `इंडिया अगेन्स्ट करप्शन`चे सदस्य आहेत.
First Published: Sunday, September 9, 2012, 21:18