`ताज`ला पुन्हा धोका?, cartridge found near by Taj hotel

`ताज`ला पुन्हा धोका?

`ताज`ला पुन्हा धोका?

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुंबईतलं फाईव्ह स्टार हॉटेल `ताज`च्या जवळ आज १६ जिवंत काडतुसं सापडली. त्यामुळे, या उच्चभ्रू परिसरात एकच खळबळ उडाली.

पाच वर्ष उलटल्यानंतर मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला अजूनही आठवला की मुंबईकरांच्या अंगावर शहारे येतात. पण, मुंबई किती सुरक्षित आहे? असा प्रश्न कित्येक वेळा उपस्थित होतो. आजही असाच प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला जेव्हा कुलाब्यातील `ताज`जवळ तब्बल १६ काडतुसं सापडली.

पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत ही जिवंत काडतुसं आपल्या ताब्यात घेतली. पोलिसांची पुढील तपास अजून सुरू आहे.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, April 2, 2014, 19:52


comments powered by Disqus