अबू आझमीवर अदखलपात्र गुन्हा दाखल, case against abu azami

अबू आझमीवर अदखलपात्र गुन्हा दाखल

अबू आझमीवर अदखलपात्र गुन्हा दाखल

www.24taas.com, मुंबई

समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांच्याविरोधात तलासरी पोलीस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आलाय. अबू आझमी यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार जितेंद्र बारक्या डोंगरकर यांनी पोलीसांत केलीय.

समाजवादी पार्टीचे नेते आणि आमदार अबू आझमी यांची तलासरी तालुक्यातील डोंगारी आणि विलातगाव परीसरात जवळपास सत्तर एकर जमिन आहे. ही जमीन गणेशकुमार गुप्ता, आभा गुप्ता ,अबू आझमी आणि जहीरा आझमी अश्या चार जणांच्या नावावर आहे. डोंगरी गावातील चौकीपाडा परीसरात जवळपास पाच एकर जमिनीवर येथील स्थानिक आदिवासींचं अतिक्रमण असुन त्यांनी इथं भातशेतीची लागवड केलीय.

याच भातशेतीत आमदार अबू आझमी यांनी बुलडोजर लावुन शेती पुर्णपणे उद्धस्त करुन टाकल्याचा प्रकार समोर आलाय. शिवाय येथील आदिवासीना त्यांनी शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकीही दिल्याचं येथील शेतकरी सांगतायेत.याबाबत शेतक-यांनी निवेदनाद्वारे आपली तक्रार पोलीसांनी दिली असता, अबू आझमी यांच्या विरोधात कलम ५०४,५०६ प्रमाणे अदखलपात्र गुन्हा तलासरी पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आला आहे.

समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांच्याविरोधात तलासरी पोलीस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आलाय. अबू आझमी यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार जितेंद्र बारक्या डोंगरकर यांनी पोलीसांत केलीय.

First Published: Friday, August 24, 2012, 20:00

comments powered by Disqus