24taas.com - Celebrities pay tribute to Vilasrao Deshmukh

राष्ट्रपतींसह विलासरावांना सेलिब्रिटींची श्रद्धांजली

राष्ट्रपतींसह विलासरावांना सेलिब्रिटींची श्रद्धांजली
www.24taas.com, मुंबई

माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर राष्ट्रपती, पंधप्रधान यांच्याहस देशातील नेते, सेलिब्रिटी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मात्र, अभिनेता अक्षय कुमार यांने मुंबईला शांघाय करणाऱ्याला नेत्याला माझी श्रद्धांजली , असे ट्विट केले आहे.

अक्षयने ट्विटरवरून विलासराव देशमुखांना `मुंबई टू शांघाय ड्रीम इज नो मोअर` या शब्दात श्रद्धांजली वाहिली आहे. मुंबईचे शांघाय करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विलासराव देशमुख यांना मी श्रद्धांजली वाहतो. माझा मित्र रितेश देशमुखला या दुखःतून उभारी घेण्यासाठी देवाने शक्ती द्यावी, ट्विट केले आहे.

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि अनेक राजकीय नेत्यांनीही देशमुखांच्या निधानाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी विश्वासू साथीदार गमाविला, या शब्दात शोक व्यक्त केला आहे. राज्यात आणि देशात ते एक चांगले प्रशासक म्हणून काम करत होते, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

सेलिब्रिटींची श्रद्धांजली

दिया मिर्झा - एक दुखाची बातमी आहे. मी देशमुख कुटुंबियांच्या दु;खात सहभागी आहे.

बिपाशा बसु - रितेश आणि देशमुख कुटुंबियांसाठी अत्यंत दु:खाची घटना आहे.

माधुरी दीक्षित - विलासराव देशमुख यांच्या निधनाची मी ऐकलेली बातमी खोटी असू दे. देशमुख कुटुंब दु:खातून बाहेर येवू दे.

अक्षय कुमार - `मुंबई टू शांघाय ड्रीम इज नो मोअर`. माझा मित्र रितेश देशमुखला या दुखःतून उभारी घेण्यासाठी देवाने शक्ती द्यावी.

फराह खान अली - विलासराव देशमुख तुमची नेहमी आठवण राहिल. रितेश आणि जेनीला परिवारसाठी मोठी दु:खत घटना आहे.

First Published: Tuesday, August 14, 2012, 20:39


comments powered by Disqus