'आयटीबीपी'ला द्यायचे २१ कोटी केंद्राकडून माफ!, central govt. forgiven 21 crore from Maharashtra

'आयटीबीपी'ला द्यायचे २१ कोटी केंद्राकडून माफ!

'आयटीबीपी'ला द्यायचे २१ कोटी केंद्राकडून माफ!
www.24taas.com, मुंबई

अतिरेकी अजमल कसाबच्या सुरक्षेसाठी ‘इंडो-तिबेट बॉर्डर’ पोलिसांना द्यावयाचे २१ कोटी रुपये केंद्रानं माफ केलेत. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी ही घोषणा केलीय.

मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये मुंबई दहशतवादी हल्ल्यातील एकमेव जिवंत आरोपी अजमल कसाब याच्या देखरेखीसाठी ‘आयटीबीपी’ची म्हणजेच केंद्रीय बलाची एक विशेष तुकडी तैनात करण्यात आली होती. कसाबच्या अटकेनंतर भारत-तिबेट सिमेवरील ३०० जवानांची ही तुकडी दिवस-रात्र पहारा देत होती. विशेष कार्य पूर्ण झाल्यानंतर या तुकडीला मुक्त करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून दलाच्या मुख्यालयाला आदेश दिले गेले. कसाबला फाशीची शिक्षा दिली गेल्यानंतर या तुकडीचं काम पूर्ण झालं होतं.
कसाबच्या फाशीनंतर आज सुशीलकुमार शिंदे यांनी पहिल्यांदाच आर्थर रोड जेलला भेट देली. तिथल्या सुरक्षेचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी राज्य सरकारनं हे आयबीपीटीला द्यावयाचे २१ कोटी रुपये आता द्यावे लागणार नाहीत, असं शिंदे यांनी स्पष्ट केलं.

First Published: Saturday, January 5, 2013, 16:04


comments powered by Disqus