Last Updated: Tuesday, June 4, 2013, 21:52
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईमध्य रेल्वेच्या मार्गावर मुसळधार पावसामुळे सिग्नल यंत्रणा बंद पडण्याच्या घटना यंदा कमी होतील, असा दावा मध्य रेल्वे प्रशासनानं केलाय.
डिजीटल एक्सिएल सिस्टीममुळे ट्रॅकवर पाणी असतानाही रेल्वे वाहतूक सुरु राहील, असा दावा रेल्वेने केलाय. परळ, शीव-माटुंगा, कुर्ला, भांडूप, मुलुंड, कल्याण या सखल भागात मुसळधार पाऊस झाला तर पाणी साचतं. तेव्हा या ठिकाणी जुनी सिग्नल यंत्रणा काढून डिजीटल एक्सिएल सिस्टीम बसवण्याचं काम सुरु आहे.
यापैकी निम्म्यापेक्षा जास्त ठिकाणी काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे पावसाळ्यात रेल्वे वाहतूक सुरळित राहत प्रवाशांना दिलासा मिळणार असल्याचा दावा रेल्वेने केलाय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Tuesday, June 4, 2013, 21:52