Last Updated: Tuesday, April 29, 2014, 10:56
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईवीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे मध्य रेल्वेची सेवा कोलमडली. आज सकाळी साडेसातच्या सुमारास तांत्रिक कारणामुळे वीज पुरवठा खंडीत झाला आणि ऐन गर्दीच्यावेळी प्रवाशांचा खोळंबा झाला. मुंबई आणि उपनगरी गाड्या उशिराने धावत होत्या. तर काही गाड्या एकाच जागेवर उभ्या होत्या. याचा फटका कार्यालयीन कर्मचाऱ्यांना बसला.
ओव्हरहेड वायरचा वीज पुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला. हा वीज पुरवठा पूर्ववत झाला तरी गाड्यांचे वेळापत्रक बिघडले.. मध्य रेल्वेवरील लोकल गाड्या, सीएसटी, कल्याण, कसारा, कर्जत मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली तर लांबपल्ल्याच्या एक्सप्रेस, मेल या गाड्यांना याचा फटका बसला.
गर्दीच्यावेळी रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यामुळे मध्य रेल्वेच्या अनेक स्टेशनांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. वीज पुरवठा थोड्यावेळाने सुरू झाला तरी स्टेशनवर गर्दी होती. गाड्यांचे वेळापत्रक कोलमडल्यामुळे ऑफिसला जाणा-या अनेकांना उशीर झाला. बिघाडाचे स्वरुप लक्षात येताच रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना याबाबतची माहिती दिली. तोपर्यंत उशीर झाला.
मुंबई ते पुणे आणि मुंबई ते इगतपुरी पर्यंतच्या पट्ट्यात ठिकठिकाणी गाड्या थांबल्यामुळे मध्य रेल्वेवर अभूतपूर्व गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. वेळापत्रक सुरळीत होण्यास किमान दुपारचे बारा वाजतील, असा अंदाज रेल्वेच्या अधिका-यांनी व्यक्त केला.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, April 29, 2014, 10:56