Last Updated: Wednesday, February 13, 2013, 11:35
www.24taas.com, मुंबई जानेवारी महिन्यात मध्य रेल्वेतून फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झालीय. मध्य रेल्वेनं केवळ एका महिन्यात अशा एकूण १ लाख १३ हजार फुकट्यांची नोंद केलीय. त्यात रेल्वे प्रवासी फुकट प्रवास करत होते किंवा ज्यादा सामानाचे पैसे भरले नसलेल्या प्रवाशांचा समावेश होता.
२०१२च्या जानेवारीमध्ये १ लाख ३ हजार प्रकरणाची नोंद करण्यात आली होती. यावर्षी फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये ९.७१ टक्यांनी वाढ झालीय. रेल्वेनं केवळ जानेवारी महिन्यात तब्बल ४.८४ कोटी रुपयांचा दंड फुकट्यांकडून वसूल केलाय. गेल्या वर्षी ४ कोटी १० लाख वसूल केले होते. एका वर्षामध्ये १८.०५ टक्यांनी वाढ झालीय.
एप्रिल ते जानेवारी २०१३ पर्यंत १४ कोटी ४३ लाख केसेस नोंदविण्यात आल्यात. या फुकट्या प्रवाशांकडून रेल्वेनं एकूण ६३.७८ कोटींची वसुली केलीय... तर गेल्या आर्थिक वर्षात एप्रिल ते जानेवारी २०१२ या काळात ११.५८ केसेस नोंदवण्यात आल्यात. यादरम्यान ४९ कोटी ९८ लाख रुपये वसूल करण्यात आलेत.
First Published: Wednesday, February 13, 2013, 11:35