चंद्राबाबू नायडू मातोश्रीवर दाखल chandrababu naidu at matoshree

चंद्राबाबू नायडू मातोश्रीवर दाखल

चंद्राबाबू नायडू मातोश्रीवर दाखल
www.24taas.com, रौनक कुकडे, झी मीडिया, मुंबई

आंध्रप्रदेशात स्वतंत्र तेलंगणावर वातावरण तापलं असतांना, तेलगू देसम पार्टीचे चंद्राबाबू नायडू आज मातोश्रीवर दाखल झाले आहेत.

तेलंगणाच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी चंद्राबाबू नायडू मातोश्रीवर आले असल्याचं सांगण्यात येत आहे. चंद्राबाबू शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

एनडीएला आणखी एक मित्र पक्ष मिळेल का?, यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणूक जवळ आली असतांना निश्चितच टीडीपीशी चर्चा होईल, असं म्हटलं जात आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, February 5, 2014, 11:35


comments powered by Disqus