जिंदालवर ‘मोक्का’सह आरोप निश्चित, charges on jindal

जिंदालवर ‘मोक्का’सह आरोप निश्चित

जिंदालवर ‘मोक्का’सह आरोप निश्चित
www.24taas.com, मुंबई

२६/११च्या मुंबई दहशतवादी हल्यातील प्रमुख आरोपी अबू जिंदाल ऊर्फ जबीउद्दीन अन्सारीवर शुक्रवारी विशेष मोक्का कोर्टात आरोप निश्चित करण्यात आलेत. हत्यारं आणि स्फोटकं बाळगल्या प्रकरणी औरंगाबादमध्ये जिंदालला अटक करण्यात आली होती.

जिंदालनं मात्र या आरोपांचे खंडन केलंय. आपला ‘लष्कर ए तोयबा` किंवा ‘सिमी’ या दहशतवादी संघटनांशी कोणताही संबंध नसल्याचा दावा यावेळी जिंदालनं केलाय. जिंदालवर मोक्कासह भारतीय दंड विधानाच्या कलमांनुसार कटकारस्थान करणे, स्फोटके दडविणे, अतिरेकी कारवाया करणे, शस्त्रसाठा करणे असे आरोप ठेवण्यात आलेत.

आठ वर्षांपूर्वी औरंगाबादमध्ये पोलिसांना तीन गाड्यांमध्ये स्फोटके व शस्त्रसाठा सापडला होता. जिंदालला सध्या आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात आले आहे.

First Published: Saturday, February 9, 2013, 17:01


comments powered by Disqus