Last Updated: Friday, February 1, 2013, 11:33
www.24taas.com,मुंबई चाटे कोचिंग क्लासेसचे संचालक मच्छिंद्र चाटे यांनी अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी आज अटक केली. यासंदर्भातील तक्रार काल (बुधवारी) रात्री उशिरा भोईवाडा पोलीस स्टेशनात दाखल करण्यात आली होती.
दादर येथील चाटे कोचिंग क्लासेसच्या शाखेत एका १७ वर्षीय मुलीचा प्रा. मच्छिंद्र चाटे यांनी विनयभंग केला, अशी तक्रार पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी भोईवाडा पोलिसात दाखल केली होती. या तक्रारी संदर्भातील माहिती भोईवाडा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक विशाल गायकवाड यांनी दिली होती.
या तक्रारीनंतर मच्छिंद्र चाटे यांना आज भोईवाडा पोलीस स्थानकात चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. चौकशीनंतर संध्याकाळी प्रा. मच्छिंद्र चाटे अटक करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
First Published: Thursday, January 31, 2013, 18:18