भाजीपाल्यांचा दर खाली, मुंबईकरांचा जीव स्थिर!, cheap vegetable kendra in mumbai

भाजीपाल्यांचा दर खाली, मुंबईकरांचा जीव स्थिर!

भाजीपाल्यांचा दर खाली, मुंबईकरांचा जीव स्थिर!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुंबईत भाजीपाला विक्री केंद्र सुरू केल्याने भाज्यांचे दर ३० टक्क्यांनी कमी झालेत. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळालाय.

राज्य सरकारनं सुरु केलेले हे भाजीपाला केंद्र कायमस्वरुपी सुरू ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मागणीनुसार आणखी १४ प्रकारच्या भाज्यांचा थेट विक्रीत समावेश करण्यात आलाय, अशी माहिती कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. सर्व भाजीपाला विक्री केंद्र हे शेतकऱ्यांचे विक्री केंद्र म्हणून रुपांतरीत करण्याची संकल्पना असल्याचंही विखे पाटील यांनी स्पष्ट केलंय. शिर्डीजवळील राहाता कृषी उत्पन्न समितीच्या नविन डाळींब विक्री केंद्राच्या उदघाटन प्रसंगी कृषीमंत्री बोलत होते.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापाऱ्यांनी तसेच इच्छुक संस्थानी मागणी केल्यास त्यांनाही थेट विक्री केंद्राचे परवाने देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. तसं झाल्यास जनतेला महागाईपासून काहीसा दिलासा मिळेल.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, July 14, 2013, 14:41


comments powered by Disqus