Last Updated: Wednesday, October 17, 2012, 12:36
www.24taas.com, मुंबईपाच वेळा बोहल्यावर चढून पाच महिलांना फसविणार्या बिपीन कारखानीस (६०) या भामट्याला जे. जे. मार्ग पोलिसांनी गुजरातमधून अटक केली. पाचव्या पत्नीने २००९ साली तक्रार केल्यापासून बिपीन फरारी होता. लग्न जमत नसल्याने बिपीन याने २००५ मध्ये दादरच्या स्वयंवर वधू-वर सूचक मंडळात नावनोंदणी केली.
त्यानुसार त्याचे सुषमा कारखानीस यांच्याशी लग्न झाले. लग्नानंतर २००९ साली कामानिमित्त लखनौ येथे जातो असे सांगून बिपीन सुषमाला माहेरी सोडून गेला. काही दिवसांनंतर परतला.
दागिन्यांमध्ये आणखी सोन्याची भर टाकतो असे सांगून दागिने घेऊन गेला तो परतलाच नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सुषमा यांनी जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत सुर्वे यांच्या पथकाने त्याला अटक केली.
First Published: Wednesday, October 17, 2012, 12:29