छोटा राजनच्या पत्नीला कोर्टानं रोखलं!, Chhota Rajan`s wife Sujata Nikhalje`s request to fly abroad rejected

छोटा राजनच्या पत्नीला कोर्टानं रोखलं!

छोटा राजनच्या पत्नीला कोर्टानं रोखलं!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

कुख्यात अंडरवर्ल्ड गँगस्टर छोटा राजन याची पत्नी सुजाता निकाळजे हिचा परदेशात जाण्यासाठी केलेला अर्ज कोर्टानं सोमवारी फेटाळून लावलाय. आपली मोठी मुलगी परदेशात शिकत असून तिला भेटण्याच्या निमित्तानं सुजातानं हा अर्ज केला होता.

सुजाता आणि राजन यांची मोठी मुलगी अंकिता निकाळजे हिनं नुकतीच पदवी प्राप्त केलीय आणि आता तिला यूकेच्या एका इन्स्टिट्यूटमध्ये ‘एमबीए’ला प्रवेश घ्यायचाय. तिला मदत करण्यासाठी म्हणून आपल्याला परदेशात जाण्याची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती सुजातानं मकोका कोर्टाकडे केली होती. यावर मकोका न्यायालयाचे न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी सुजाता निकाळजे हिचा हा अर्ज फेटाळून लावला. सुजाताच्या विनंती अर्जावर गुन्हे शाखेनं आक्षेप नोंदविला होता. तीची ही धडपड तिचा पती राजन निकाळजे याची भेट घेण्यासाठीही असू शकते, अशी शक्यताही क्राईम ब्रान्चनं व्यक्त केली होती.

सुजाता हिला अंकिता, निकिता आणि खुशी या तीन मुली आहेत. ‘मी सध्या मुंबईत शांतीपूर्ण जीवन जगत आहे... केवळ एका गँगस्टरची बायको असल्याच्या कारणावरून माझा परदेशात जाण्याचा हक्क हिरावला जाऊ नये’ असं सुजातानं आपल्या विनंती अर्जात म्हटलं होतं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, August 14, 2013, 13:39


comments powered by Disqus