मुंबईत बाळचोरीच्या घटना सुरुच child robber

मुंबईत बाळचोरीच्या घटना सुरुच

मुंबईत बाळचोरीच्या घटना सुरुच
www.24taas.com, मुंबई

मुंबईत बाळचोरीच्या घटना सुरुच आहे. मुंबईतल्या सीएसटी स्थानकातून मूल चोरीच्या घटनेला काही महिने उलटल्यानंतर मुंबईत आणखी एक मूल चोरीची घटना घडलीय. ही बाळचोरीची घटना सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झालीय...

लक्ष ठेवा तुमच्या बाळावर... कारण मुंबापुरीत तान्हुल्यांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. दादर स्टेशनचं प्लॅटफार्म नंबर सहा... ९ मार्चला सकाळी सहा वाजता एक महिला आपल्या मुलासह झोपली होती. काही वेळानं इथं पांढ-या शर्टमधली व्यक्ती येते....महिला झोपलेली पाहून ही व्यक्ती तिचं 1 महिन्याचं बाळ चोरण्याचा प्रयत्न करतो.... आजूबाजूच्या गर्दीचा अंदाज घेत सावधपणे तो बाळ चोरून पसार होतो...मात्र त्याची ही चोरी तिस-या डोळ्यात कैद झालीय...

या घटनेनंतर बाळाची आई परवीन शेखनं पोलिसांत तक्रार दाखल केलीय...भीक मागण्यासाठी बाळ चोरल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय.. शिवाय पोलिसांनी 5 जणांची टीम बनवलीय...



काही महिन्यांपूर्वी मुंबई सीएसटी स्थानकावरुनही बाळ चोरल्याची घटना घडली होती... आता मुंबईतल्या दादरसारख्या ठिकाणाहून बाळ चोरीच्या घटना घडल्यानं तान्हुल्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय...

First Published: Sunday, March 10, 2013, 21:03


comments powered by Disqus