सेना-मनसे समाजात फूट पाडताहेत - सीएमचा टोला, cm lashes out on sena and mns

सेना-मनसे समाजात फूट पाडताहेत - सीएमचा टोला

सेना-मनसे समाजात फूट पाडताहेत - सीएमचा टोला

www.24taas.com, मुंबई
काही पक्षांनी समाजात फूट पाडू नये. फूट पाडणा-यांना सरकार कायदा हातात घेऊ देणार नाही असा इशारा मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता शिवसेना-मनसेला दिलाय.

व्होट बँक तयार करण्यासाठीच काही पक्षांकडून समाजात दुहीचं राजकारण केलं जात असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलंय. गेल्या काही दिवसांपासून बिहार विरुद्ध ठाकरे असा वाद सुरू आहे. या वादावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केलीय.

काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी ठाकरे कुटुंबिय बिहारी असल्याचे पुरावे सादर केले होते. त्यानंतर उठलेल्या वादळावर मुख्यमंत्री आज पहिल्यांदा बोलले.


First Published: Friday, September 7, 2012, 17:12


comments powered by Disqus